इस्लामपूर (सांगली)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८ जणांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमसुद्दीन संदे (रा.पेठ) माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशीकांत प्रकाश पाटील सचिन उर्फ सनी मारूती खराडे (रा. इस्लामपूर), शाकीर इसालाल तांबोळी (रा.इस्लामपूर ) सुर्यकांत उर्फ पोपट तुकाराम मोरे (रा. पलूस), प्रसाद उत्तमराव पाटील ( रा.इस्लामपूर) यासह ३५० ते ४०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्वाभिमानीचे राजू शेट्टींसह ४०० जणांवर गुन्हा दाखल, इस्लामपूर पोलिसांची कारवाई
पूरग्रस्तांच्या मागणीसाठी मंगळवारी (काल) इस्लामपुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जमाव जमवून मोर्चा व सभा घेत आदेशाचा भंग केला. याप्रकरणी पोलीस फौजदार बाजीराव पाटील यांनी तक्रार दिली.
पूरग्रस्तांच्या मागणीसाठी मंगळवारी (काल) इस्लामपुरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जमाव जमवून मोर्चा व सभा घेत आदेशाचा भंग केला. याप्रकरणी पोलीस फौजदार बाजीराव पाटील यांनी तक्रार दिली. कोविड प्रतिबंधात्मक कलम ११ प्रमाणे उपाययोजना म्हणून जिल्ह्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने व सर्वोच्च न्यायालयाने आदेश निर्देशित केले आहेत. असे असताना देखील आरोपींनी जमाव टाळण्यासाठी नियोजीत मोर्चा रद्द करून सनदशीर मार्गाचा अवलंब करावा, याकरीता नोटीस बजावण्यात आली होती, असे असताना देखील जमाव जमवून मोर्चा व सभा घेवून आदेशाचा भंग केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालय इस्लामपूर दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला होता.
हेही वाचा -सोलापूरमध्ये शेतकऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न