सांगली - वीज दरवाढीच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. येत्या 15 दिवसांमध्ये अन्यायकारक वीज दरवाढ मागे घ्या, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठेकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
वीज दरवाढीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन - वीज वितरण कंपनी
वीज दरवाढीच्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. येत्या 15 दिवसांमध्ये अन्यायकारक वीज दरवाढ मागे घ्या, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठेकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
वीज वितरण कंपनीकडून वीज बिलामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्व कामधंदे बंद असल्यामुळे नागरिक आर्थिक संकटात आहेत. मग ते वाढीव वीजबिल कसे भरणार असा सवाल उपस्थित करत, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. सांगली शहरातील विश्रामबाग येथील वीज वितरण कार्यालयासमोर जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. वीजबिल कमी करावे, बिलांमध्ये सवलत द्यावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.