सांगली - दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची सुरुवात सांगलीमध्ये आक्रमक पद्धतीने झाली. दुधाचा टँकर फोडून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडण्यात आले. इस्लामपूरच्या पेठे येथे पुणे-बंगळुरू हायवेवर पहाटेच्या सुमारास स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने आंदोलन करत दूध दर वाढीची मागणी केली.
आंदोलनाचा भडका, सांगलीत दुधाचा टँकर फोडून हजारो लीटर दूध स्वाभिमानीने रस्त्यावर सोडले - स्वाभिमानी दूध दर वाढ आंदोलन बातमी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूध दर वाढीसाठी राज्यभर दूध आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाची सुरुवात सांगली जिल्ह्यात आक्रमक पद्धतीने झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूरच्या पुणे बंगळुरू हायवेवर पेठ येथे आंदोलन करण्यात आले. पहाटे ६ च्या सुमारास दूध टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडण्यात आले.
दुधाचा टँकर फोडून हजारो लीटर दूध स्वाभिमानीने रस्त्यावर सोडले
गाई आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये वाढ मिळावी, केंद्राने दूध भुकटी आयात निर्णय बदलण्यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. सरकारने याची दखल न घेतल्यास एकही टँकर सोडणार नाही, सर्व टँकर फोडून अशाच पद्धतीने दूध रस्त्यावर सोडण्यात येईल, असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.
Last Updated : Jul 21, 2020, 9:39 AM IST