महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एफआरपी आंदोलनाची ठिणगी भडकली; क्रांती कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवले

यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन २ महिने उलटले. मात्र, ऊस पट्ट्यातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप एफआरपीची रक्कम दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी क्रांती कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवून दिले आहे..

क्रांती कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवले
क्रांती कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवले

By

Published : Jan 6, 2021, 1:38 PM IST

Updated : Jan 6, 2021, 2:23 PM IST


सांगली- एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यात आंदोलन सुरू झाले आहे. पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्याचे कार्यालय पेटवण्यात आले आहे. घोगाव येथील सबऑफिस कार्यालय पेटवून देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांचा हा क्रांती कारखाना आहे.

स्वाभिमानीचा एफआरपीसाठी एल्गार...

जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची एकरकमी एफआरपी दिली नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत.

एफआरपी आंदोलनाची ठिणगी भडकली
क्रांतीचे ऊस कार्यालय पेटवले..राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांच्या क्रांती कारखान्याच्या तालुक्यातल्या घोगाव येथील कारखान्याचे कार्यालय पेटवून देण्यात आले आहे. पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी कार्यालयाला आग लावली आहे. या आगीत कार्यालयातील कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले आहे. पदवीधर निवडणुकीच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना व कारखानादारांच्या बैठकीमध्ये क्रांती कारखान्याकडून एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र निवडणुकीनंतर आता कारखाना प्रशासनाकडून एकरकमी एफआरपी देण्यामध्ये तडजोडीची भूमिका घेण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना क्रांती कारखान्याचे ऊस कार्यालय पेटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे.अन्यथा तीव्र आंदोलन उभे करणार...दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या घटनेची जबाबदारी घेण्यात आली नाही. मात्र जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीची जी मागणी केली आहे. त्यानुसार साखर कारखानदारांनी एफआरपी द्यावी, अन्यथा या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन उभा करेल, असा इशारा दिला आहे.
Last Updated : Jan 6, 2021, 2:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details