सांगली : मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी इंस्टास्टार गौतमी पाटील (Intastar Gautami Patil Lavani Program) याच्या लावणी कार्यक्रमा दरम्यान प्रेक्षकांनी प्रचंड धुडगूस घालत शाळेच्या छतावर धिंगाणा (Audience Confusion in Lavani Program) घातला. आता या कार्यक्रमाच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह (Death of Man in Lavani Program Stampede) आढळून (Suspicious death of person in a stampede) आल्याने एकच खळबळ उडाली. या व्यक्तीचा मृत्यू गर्दीमध्ये चेंगराचेंगरी (stampede at Lavni Programm in Sangli) झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. तर पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. (Latest News from Sangli), Sangli Crime
Death Of Man In Lavani Program : धुडगूस घातलेल्या 'त्या' लावणी कार्यक्रमाच्या परिसरात आढळला मृतदेह - लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा गोंधळ
मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी इंस्टास्टार गौतमी पाटील (Intastar Gautami Patil Lavani Program) याच्या लावणी कार्यक्रमा दरम्यान प्रेक्षकांनी प्रचंड धुडगूस घालत शाळेच्या छतावर धिंगाणा (Audience Confusion in Lavani Program) घातला. आता या कार्यक्रमाच्या परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह (Death of Man in Lavani Program Stampede) आढळून (Suspicious death of person in a stampede) आल्याने एकच खळबळ उडाली. या व्यक्तीचा मृत्यू गर्दीमध्ये चेंगराचेंगरी (stampede at Lavni Programm in Sangli) झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. (Latest News from Sangli), Sangli Crime
![Death Of Man In Lavani Program : धुडगूस घातलेल्या 'त्या' लावणी कार्यक्रमाच्या परिसरात आढळला मृतदेह Death Of Man In Lavani Program](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16802578-thumbnail-3x2-death.jpg)
लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांची अशीही धडपड -30 ऑक्टोबर रोजी मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी एका मंडळाकडून मान्यवर व्यक्तींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने प्रसिद्ध insta स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याविष्काराचा ही कार्यक्रम घेण्यात आला होता. गौतमी पाटील हीच्या लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी हजेरी लावली होती. जिल्हा परिषद बेडग शाळेच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र संपूर्ण पटांगण हे गर्दीने प्रचंड भरून गेले होते. त्याहीपेक्षा अधिक गर्दी झाल्याने अनेक प्रेक्षकांनी शाळेच्या छतावर चढून लावणीच्या तालावर ठेका धरला होता. ज्यामध्ये कौलांची मोठी नासधुस झाली होती.त्याचबरोबर शाळेच्या आवारातील एका झाडावर देखील अनेकांनी बसून या लावणीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये झाडू उनमळून पडले होते. प्रचंड अशी गर्दी या कार्यक्रमासाठी झाली होती.
गर्दीत चेंगरून व्यक्तीचा मृत्यू-दरम्यान शाळेच्या आवारामध्ये सदस्याचा कार्यक्रम पार पडला तर परिसराच्या बाहेर आता एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दत्तात्रय विलास ओमासे असे या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीचा मृत्यू हा प्रचंड गर्दीमध्ये खाली पडून चेंगूरून झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. दरम्यान मिरज ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूच्या घटनेची नोंद करून घेतली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे मिरज पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे.