महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरेश खाडेंच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे भाजप कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत..

भाजपचे चार आमदार, एक खासदार अशी स्थिती असणाऱ्या सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळात कधी स्थान मिळणार याची प्रतीक्षा अखेर संपली. मिरजेचे आमदार खाडे यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद शेवटी मिळाले. त्यामुळे खाडेंच्या समर्थकांनी जल्लोष केला..

सांगली

By

Published : Jun 16, 2019, 9:54 PM IST

सांगली - मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून आज सुरेश खाडे यांनी शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जल्लोष केला आहे.

सांगली

भाजपचे चार आमदार, एक खासदार अशी स्थिती असणाऱ्या सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळात कधी स्थान मिळणार याची प्रतीक्षा अखेर संपली. मिरजेचे आमदार खाडे यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद अखेर मिळाले आहे. तीन वेळा भाजपचे आमदार म्हणून सुरेश खाडे निवडून आलेले आहेत. जतसारख्या दुष्काळी तालुक्‍यात पहिल्यांदा भाजपच्या चिन्हावर सुरेश खाडे यांनी निवडणूक लढवत जिल्ह्यात पहिल्यांदा कमळ फुलवले होते. गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकी वेळेस मिरजेतून सुरेश खाडे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील भाजपचे जेष्ठ आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. उद्योजक ते मंत्री असा सुरेश खाडे यांचा प्रवास अत्यंत संघर्षपूर्ण राहिला आहे. तासगाव तालुक्यातील पेड हे त्यांचे मूळ जन्मगाव अत्यंत गरीब घरात खाडे यांचा जन्म झाला होता.

एक नजर टाकूया मंत्री खाडे यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर

नाव :- आमदार डॉ.सुरेश दगडू खाडे

जन्मदिनांक :- १ जून १९५८

शिक्षण :- १) वेल्डिंग डिप्लोमा ( व्हिजीटी आय , मुंबई ) ब्रान्झ व सिल्वर मेडल

२) डॉक्टरेट , कोलंबो विद्यापीठ, श्रीलंका )

व्यवसाय :- उद्योग व शेती

आमदार सुरेश खाडे हे २००४ साली जत मधून, २००९ साली मिरज मधून आणि २०१४ साली पुन्हा मिरजमधून असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सुरेश खाडे हे भाजपचे सांगली जिल्ह्यातून विधानसभेवर निवडून आलेले पहिले आमदार आहेत. त्यापूर्वी त्यांनी १९९९ ला जत राखीव मतदार संघातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

भाजपमध्ये सुरेश खाडे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्या गटाचे म्हणूनओळखले जातात. उद्योजक असणाऱ्या सुरेश खाडे यांनी आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षातून केली.

भूषविलेले पदे :-

(1 ) सदस्य अनुसूचित कल्याण समिती , महाराष्ट्र विधानसभा.

(2) सदस्य अंदाज समिती , महाराष्ट्र विधानसभा

(3) सदस्य पंचायत राज समिती , महाराष्ट्र विधानसभा

(4) सदस्य उपविधान समिती , महाराष्ट्र विधानसभा

(5) संचालक, राहुरी कृषी विद्यापीठ, राहुरी

(6) सांगली जिल्हा भाजप, अध्यक्ष ( ग्रामीण )

काँग्रेस आघाडीच्या सत्तेनंतर चार वर्षांपासून सांगली जिल्ह्याला भाजपकडून केवळ सदाभाऊ खोत यांच्या रूपाने राज्यमंत्रीपद मिळाले होते. मात्र, भाजपच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही,असा प्रश्न कायम होता. पण, अखेरच्या काळात भाजपने मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपद देऊन सांगलीचा मंत्रिमंडळ समावेशाचा प्रश्न संपवून टाकला आहे. रविवारी सुरेश खाडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर मिरजमध्ये सुरेश खाडे यांच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details