सांगली - जिल्हापातळीवर आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्यासमवेत सर्व घटकांचा समन्वय आहे. अशाच प्रकारे तालुका पातळीवर देखील सर्व यंत्रणेच्या प्रमुखांनी समन्वय ठेवून काम केल्यास प्रभावीपणे काम होईल, व लवकरच कोविड या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखू शकतो, असा आत्मविश्वास पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केला आहे. ते जत येथील जिल्हाबंदीचे चेक पोस्ट, कंटेनमेंट झोन, कोविड केअर सेंटर, लसीकरण केंद्रे हॉटस्पॉट याबाबत सर्व विभागाच्या प्रमुख अधिकारी समवेत आढावा घेतला, यावेळी बोलत होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार हनमंत म्हेत्रे, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर यांच्यासह नगरपालिका विभागासह सर्व विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व यंत्रणेने समन्वय ठेवावा : कोरोनाविषयी आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांचे आवाहन
जिल्हापातळीवर आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्यासमवेत सर्व घटकांचा समन्वय आहे. अशाच प्रकारे तालुका पातळीवर देखील सर्व यंत्रणेच्या प्रमुखांनी समन्वय ठेवून काम केल्यास प्रभावीपणे काम होईल, व लवकरच कोविड या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखू शकतो, असा आत्मविश्वास पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केला आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे. कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतर ठेवावे, या नियमांचे काटेकोरपणे अवलंब करणे आवश्यक आहे. तसेच जे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत ते बाहेर फिरणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोरोनाची लक्षणे आढळून येताच नागरिकांनी त्वरीत तपासणी करून घ्यावी. लवकर औषध उपचाराला सुरुवात करावी, जेणेकरून प्राथमिक अवस्थेतच तो आजार बरा करता येईल, असेही आवाहन गेडाम यांनी केले आहे.
हेही वाचा- १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस, १ मे रोजी नव्हे 'या'वेळी सुरू होईल लसीकरण