महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिला दिन विशेष : वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या 'सुपर रायडर' निशिगंधाने मिळवला 'हा' बहुमान! - हार्ले डेव्हिडसन

महिला सगळ्याच क्षेत्रात पुढे आहेत. कोणतेच क्षेत्र आता महिलांच्या आवाक्यापासून दूर नाही, अगदी बाईक रायडींगचे क्षेत्रही महिलांनी काबीज केले आहे. या क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातुन आपल्या सुपर फास्ट रायडिंगने सांगलीच्या निशिगंधा कदम यांनी नाव कोरले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाहुयात सुपर रायडर निशिगंधाचा भन्नाट प्रवास...

Nishigandha Kadam
निशिगंधा कदम

By

Published : Mar 7, 2020, 9:03 AM IST

सांगली -बाईक, कार, रेस हे शब्द कानावर पडले की, आपोआपच मुले समोर येतात. मात्र, सांगलीतील एका मुलीने बाईक रायडींगमध्ये मुलांनाही मागे सोडले आहे. निशिगंधा कदम असे या सुपर रायडर वुमनचे नाव आहे. निशिगंधाने 13 दिवसात 10 हजार किलोमीटरचा प्रवास आपल्या बाईकवरून पूर्ण केला आहे. सुसाट वेगाने त्यांनी १७ राज्यांतून हा प्रवास केला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाहुयात सुपर रायडर निशिगंधाचा भन्नाट प्रवास...

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाहुयात सुपर रायडर निशिगंधाचा भन्नाट प्रवास

महिला सगळ्याच क्षेत्रात पुढे आहेत. कोणतेच क्षेत्र आता महिलांच्या आवाक्यापासून दूर नाही, अगदी बाईक रायडींगचे क्षेत्रही महिलांनी काबीज केले आहे. या क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या सुपर फास्ट रायडिंगने सांगलीच्या निशिगंधा कदम यांनी नाव कोरले आहे. निशिगंधा कदम यांनी १३ दिवसात १० हजार किलोमीटरचे अंतर हार्ले डेव्हिडसन या अॅडव्हेंचर बाईकवरून पार केले.

हेही वाचा -लोकांनी हिणवले, टोमणे मारले; पण 'ती'ने जिद्दीने गॅरेज चालवून चारही मुलांना बनवले डॉक्टर

निशिगंधाला लहानपणापासूनच बाईक चालवण्याची आवड होती. मात्र, सुरुवातीला त्यांनी महिलांसाठी असणाऱ्या मोपेड गाड्याच चालवल्या. अनेकदा परगावी प्रवास करताना त्यांना बाईक रायडरचे ताफे पहायला मिळायचे. ते पाहून आपणही अशा पद्धतीने गाडी चालवले पाहिजे, अशी इच्छा त्यांना वाटत असे. काळजीपोटी बाईक चालवण्यासाठी त्यांच्या घराच्यांचा विरोध होता. तरीही त्या चोरून गाडी चालवायच्या. काही तरी करून दाखवण्याची जिद्द असणाऱ्या निशिगंधा यांनी स्वतःचा फास्ट फुडचा व्यवसाय उभा केला. आणि स्वकमाईतून त्यांनी साडे सात लाखांची हार्ले डेव्हिडसन ही गाडी खरेदी केली. पश्चिम महाराष्ट्रात महिलेकडे अशी गाडी असणाऱ्या निशिगंधा या एकमेव महिला असल्याने, बाईक कंपनीकडून त्यांना हार्ले लेडीचा 'बहुमान'ही मिळाला आहे.

250 किलो वजनाची आणि 750 सीसी इंजीन क्षमता असणारी ही अवजड गाडी निशिगंधा अगदी सहज चालवतात. ही गाडी चालवणे सोपी गोष्ट नाही. यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्टया सक्षम असणे खूप आवश्यक असल्याचे निशिगंधा सांगतात. ही गाडी खरेदी केल्यानंतर कंपनीचे काही अडव्हेंचर चॅलेंज असतात. ज्या मध्ये देशातील हार्लेच्या शोरूमना भेट देण्याचेही चॅलेंज असते. या चॅलेंजसाठी वर्षातून तीन वेळा हार्लेचे रायडर देश भ्रमंतीला निघतात. मात्र, निशिगंधा यांनी हे चॅलेंज अवघ्या 13 दिवसात पूर्ण केले. सांगली आणि कोल्हापूरमधील काही कुशल बाईक रायडर सोबत त्यांनी हा प्रवास सुरू केला होता.

खडतर रस्ते, कधी दिवसा कधी रात्री गाडी चालवणे, वेळेत एखाद्या ठिकाणी पोहचणे अशी अनेक आव्हाने पार करून निशिगंधाने आपला प्रवास पूर्ण करुन महिलांसाठी काहीही अशक्य नाही हे सिद्ध करुन दाखवले. पुढच्या प्रवासासाठी ईटीव्ही भारतकडून निशिगंधा यांना शुभेच्छा.

ABOUT THE AUTHOR

...view details