जत (सांगली) -जत तालुक्यातील डफळापूरमधील 34 वर्षीय तरुणाने शेतातील घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सिध्दरामेश्वर मल्लय्या स्वामी असे मृत तरुणाचे नाव आहे.
सिध्दरामेश्वर मल्लय्या स्वामी या तरुणाने शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्यापूर्वी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत जत पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल इनामदार यांनी घटनेची नोंद केली आहे.
हेही वाचा-केंद्राकडून कोरोना लशीसह ऑक्सिजन उपकरणांवरील आयात शुल्क माफ
संचारबंदीमुळे व्यवसायात सतत अपयश
सिध्दरामेश्वर स्वामी यांचे गावात पंक्चरचे दुकान होते. संचारबंदी लागू असल्याने अनेक दिवस दुकान बंद आहे. तसेच गेल्या वर्षी शेतीचे उत्पादन घटले. सतत येत असलेल्या अपयशामुळे सिध्दरामेश्वर यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ व त्याची पत्नी असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.