जत तालुक्यातील करजगी येथे विवाहितेची जाचास कंटाळून पेटवून घेऊन आत्महत्या - जत तालुक्यातील करजगी आत्महत्या
शेतातील कामे आणि चारित्र्याच्या संशयावरून दिलेल्या शारीरिक व मानसिक त्रासास कंटाळून ज्योती महादेवाप्पा पट्टणशेट्टी या २८ वर्षीय विवाहितेने करजगी येथे सासरच्या घरी स्वतःला जाळून घेतले. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ च्या दरम्यान घडली. पीडित महिलेला सांगली येथे उपचारासाठी दाखल केले असता १९ फेब्रुवारी रोजी तिचे निधन झाले.
जत (सांगली) - तालुक्यातील करजगी येथे शेतातील कामे आणि चारित्र्याच्या संशयावरून दिलेल्या शारीरिक व मानसिक त्रासास कंटाळून ज्योती महादेवाप्पा पट्टणशेट्टी या २८ वर्षीय विवाहितेने करजगी येथे सासरच्या घरी स्वतःला जाळून घेतले. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ च्या दरम्यान घडली. पीडित महिलेला सांगली येथे उपचारासाठी दाखल केले असता १९ फेब्रुवारी रोजी तिचे निधन झाले. सांगली शासकीय रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत आज उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
जाचास कंटाळून आत्महत्या
मयत पीडित महिलेचे आठ वर्षांपूर्वी महादेवाप्पा बरोबर लग्न झाले. महादेवाप्पा पट्टणशेटी याने पहिले लग्न झाले असताना व पहिल्या बायकोला २ मुले असताना देखील मयत ज्योती हिच्याशी लग्न केले. ज्योतीला देखील २ मुले आहेत. महादेवाप्पा यांच्या दोन्ही बायका एकाच कुटुंबात एकत्र राहत होत्या. अनेक दिवसांपासून संशयित आरोपी महादेवाप्पा सिद्राम पट्टणशेट्टी व दीर मल्लाप्पा सिद्राम पट्टणशेट्टी यांनी मयत ज्योती हिला शेतातील कामासाठी व चारित्र्याच्या संशयावरून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. दिलेल्या त्रासास कंटाळून विवाहित पीडित महिला ज्योती हिने १८ फेब्रुवारी रोजी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली.
पती आणि दिराविरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल
मुलीचे वडील धानाप्पा चनप्पा ब्यागेळी रा. अहिरसंघ ता. इंडी (कर्नाटक) यांनी उमदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. उमदी पोलिसांनी संशयित आरोपी महादेवाप्पा सिद्राम पट्टणशेट्टी (वय ३८) व मल्लाप्पा सिद्राम पट्टणशेट्टी (वय ३६) दोघे राहणार करजगी यांच्या विरुद्ध ३०६, ४९८अ, ३२३,३४ या कलमाखाली उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.