सांगली - मिरज शासकीय रुग्णालयातील एका डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवंशी ज्ञानोबा चोखोबा असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून मिरजमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आजाराला कंटाळून ही आत्महत्या केल्याची चिठ्ठी यावेळी आढळून आली आहे.
आजारपणाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या
मिरजेच्या शासकीय रुग्णालयात कान, नाक आणि घास विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे सोमवंशी ज्ञानोबा चोखोबा,वय 64 यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आजाराला कंटाळून ही आत्महत्या केल्याची चिठ्ठी यावेळी आढळून आली आहे.
मिरजेच्या शासकीय रुग्णालयात कान, नाक आणि घास विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे सोमवंशी ज्ञानोबा चोखोबा,वय 64 यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.मूळचे औरंगाबाद येथील असणारे डॉ. सोमवंशी यांची मिरजच्या शासकीय रुग्णालयात बदली झाली होती. सध्या मिरजेच्या भाऊराव चौक येथील युनिक प्लाझा येथे डॉ. सोमवंशी हे भाड्याने राहत होते. त्यांचे, कुटुंब औरंगाबाद येथे राहते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी राहत असलेली फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी डॉक्टर सोमवंशी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी आढळून आली आहे. ज्यामध्ये आजारणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले असल्याचे मिरज पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -नवी मुंबईतील निवृत्त पोलिसाने झाडल्या पोटच्या मुलांवर गोळ्या; दोन जण जखमी