सांगली- एफआरपी दर व अवकाळी पावसामुळे राजारामबापू साखर कारखाना उशिरा सुरु झाला. मात्र, ऊस तोड कामगार आधिच जिल्ह्यात दाखल झाला होता. खारखाना सुरू होईपर्यंत ऊसतोड कामगार वीस दिवस बिनकामी राहिला. त्यामुळे, ऊस कामगार आर्थिक अडचणीत सापडला आहे.
महाराष्ट्रामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्हा हा ऊस शेतीची पंढरी म्हणून ओळखल्या जाते. दसरा संपल्या नंतर बीड, उस्मानाबाद सोलापूर, मोहोळ व इतर जिल्ह्यातील ऊस कामगार मोठ्या प्रमाणात आपली लहान मुलं-बाळं व जनावरे असा प्रपंच सोबत घेऊन तीन-चार महिने मिळेल त्या ठिकाणी सदर जिल्ह्यात वास्तव्य करतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सांगली जिल्ह्यातील राजाराम बापू साखर कारखान्याचे ऊस तोड कामगार बाहेरील जिल्ह्यातून दिवाळी पूर्वीच आपला संसार घेऊन वाळवा तालुक्यातील कुरळप व परिसरातील गावांच्या शेतात झोपड्या बांधून राहिले.