सांगली : ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अपघात झाला (Sugarcane workers truck accident in sangali) आहे. जतमध्ये गाडी पलटी होऊन हा अपघात झाला असून यामध्ये 15 ऊस तोड मजूर जखमी झाले (15 people including children were injured) आहेत. ज्यामध्ये महिलांच्या लहान मुलांचा देखील समावेश असून सर्व जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Sugarcane Workers Accident : ऊसतोड मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात ; लहान मुलांसह 15 जण जखमी
ऊस तोडणी मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अपघात झाला (Sugarcane workers truck accident in sangali) आहे. जतमध्ये गाडी पलटी होऊन हा अपघात झाला असून यामध्ये 15 ऊस तोड मजूर जखमी झाले (15 people including children were injured) आहेत.
गाडी पलटी झाली :बीड आणि जालना जिल्ह्यातील ऊसतोड मजुर कर्नाटक राज्यातल्या बेळगी साखर कारखान्याकडे निघाले होते. सांगली जिल्ह्यातल्या जतमार्गे कर्नाटककडे निघाली असताना जत शहरापासून काही अंतरावर ऊसतोडणी मजुरांचा ट्रक पोहोचला. अचानकपणे ट्रकच्या चालकाने ब्रेक दाबला, ज्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी (Sugarcane Workers Accident) झाली.
ऊसतोड मजूर गंभीर जखमी :या अपघातात गाडीमध्ये असणारे सुमारे 15 ऊसतोड मजूर हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींमध्ये महिलांसह लहान मुलांचा देखील समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी अद्याप झाली नाही. मात्र ट्रक आणि ऊसतोड मजुरांच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले (Sugarcane workers accident in sangali) आहे.