सांगली जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन आणखी तीन दिवसांनी वाढवला.. - सांगलीत कडक लॉकडाऊन
सांगली जिल्ह्यात 15 मे पर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन आता आणखी तीन दिवसांनी वाढविण्यात आला आहे. 17 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला आहे.
सांगली - जिल्ह्यात 15 मे पर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन आता आणखी तीन दिवसांनी वाढविण्यात आला आहे. 17 मे पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या अजून कमी झाली नाही, पण पॉझिटिव्ह येण्याचा रेट 30 टक्क्यांपर्यंत स्थिर झाला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा जास्त असून त्यामध्ये घट करण्याच्या दृष्टीने आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा करून जिल्ह्यात 5 मे पासून 15 मे पर्यंत लागू असलेला लॉकडाऊन आणखी तीन दिवस म्हणजे दि.17 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय सोमवारी घेण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
खते-बियाणे घरपोच देण्याबाबत सूचना..
तसेच या बैठकीत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची खते, बी-बियाणे, कीटकनाशके आदींबाबत गैरसोय निर्माण होऊ नये. यासाठी प्रशासनाने कृषी निविष्ठा दुकानदारांशी तात्काळ चर्चा करून कोरोना संसर्ग टाळून कृषी निविष्ठांची घरपोच डिलिव्हरी करता येईल, का याबाबत चर्चा करावी, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत.