सांगली – टाळेबंदीत खायला मिळत नसल्याने पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी मिरजमध्ये लहान मुलांवर हल्ला केला. या हल्ल्यात चार लहान मुले जखमी झाले आहेत. जखमी मुलांवर सांगलीच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
मिरज शहरात भटक्या कुत्र्याने हल्ला करून चार लहान मुलांचे लचके तोडले आहेत. शहरातील इदगाह नगर झोपडपट्टटी व मालगाव रोड दत्त नगर याठिकाणी हा प्रकार घडला आहे. रश्मीया नईम मुजावर, आरमान सिकंदर बेपारी व इतर मुले या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.