महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Strange Tanker Accident : टॅंकरचा विचित्र अपघात; आधी दुचाकींना उडवले मग निखळलेल्या चाकामुळे महिला ठार

आटपाडी तालुक्यातील झरे येथे ( Strange Tanker Accident ) झालेल्या अपघातात एका महिला ठार झाली आहे. (First two wheeler was blown up ) या बाबतीत आटपाडी (sangali accident ) पोलिसांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे एका कृषी केंद्रासमोर टॅंकरचा विचित्र अपघात झाला. संगीता पवार असे ठार झालेल्या तर राणी पवार असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ( woman killed due to dislodged wheel )

Strange Tanker Accident
टॅंकरचा विचित्र अपघात

By

Published : Dec 29, 2022, 7:36 AM IST

सांगली :आटपाडी तालुक्यातील झरे येथे ( sangali accident ) भरधाव आलेल्या दहा चाकी टँकरचा ( Strange Tanker Accident ) विचित्र अपघात घडला आहे. आधी दुचाकीला जोरदार धडक ( First two wheeler was blown up ) दिली. याचवेळी टॅंकरचे मागील चाक निखळलेले आणि संगीता पवार यांच्या अंगावर जाऊन आदळले. ( woman killed due to dislodged wheel )

असा घडला अपघात :भरधाव आलेल्या दहा चाकी टँकरने आधी झरे गावातील औषध दुकानासमोर थांबलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली,त्यानंतर औषध दुकाना शेजारी असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक दुकाना बाहेर थांबलेल्या राणी पवार यांना टँकरने उडवले. त्यानंतर पुढील असणाऱ्या बोअरवेल दुकानातून बाहेर पडून आपल्या दुचाकीकडे निघालेल्या प्रकाश पवार आणि संगीता पवार यांच्या गाडीला उडवले. याचवेळी टॅंकरचे मागील चाक निखळलेले आणि ते थेट संगीता पवार यांच्या अंगावर जाऊन आदळले. ज्यामध्ये संगीता पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या ठार झाल्या.

टँकर चालकावर गुन्हा दाखल :मात्र या अपघातानंतर टॅंकर चालकाने गाडी न थांबवता गाडीसह पळ काढला, पण गावातील तरुणांनी टँकरचा पाठलाग करत टॅंकर चालकाला पकडून आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी ट्रक चालक सुरेश सूर्यवंशी राहणार भूयाचीवाडी तालुका कराड याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

नाशिक मध्येही घडली भीषण अपघाताची घटना :मालेगावतील दाभाडी येथून सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा अपघात हाेऊन ३० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते त्यावेळी पिकपला अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ३० जण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवार रोजी घडली आहे. आज सकाळच्या सुमारास दाभाडी येथील बंडु गांगुर्डे यांच्या पिकअप क्रमांक (एमएच १८ बी. झेड. ८१६७)मधून हे भाविक सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. त्यावेळी सप्तशृंगीचे मंदिर अवघे एक किलोमीटर अंतरावर असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाले. त्यामधील सुमारे 30 भाविक या अपघातात जखमी झाले आहेत. दरम्यान, यानंतर गडावरील नागरिकांनी आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत काही जखमींना वणी तर काहींना नांदुरी येथे पुढील उपचारासाठी दाखल केले. वणी ग्रामीण रुग्णालयात २३ जखमींवर उपचार सुरु आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटल्याची माहिती समाेर येते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details