महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीतही आढळल्या 'त्या' विचित्र अळ्या - प्रादुर्भाव

बुधगावात सापा सारख्या विचित्र अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच औरंगाबाद, परभणी आणि जळगावमध्ये अशा प्रकारच्या अळ्या सापडल्याचा प्रकार समोर आला होता.

सांगलीतही आढळल्या 'त्या' विचित्र आळ्या

By

Published : Jul 22, 2019, 4:32 PM IST

सांगली- येथील बुधगावात सापा सारख्या विचित्र अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच औरंगाबाद, परभणी आणि जळगावमध्ये अशा प्रकारच्या अळ्या सापडल्याचा प्रकार समोर आला होता.

सांगलीतही आढळल्या 'त्या' विचित्र आळ्या


गावात रहस्यमय अळ्या आल्याची बातमी पसरताच ग्रामस्थांनी या विचित्र सापासारख्या दिसणाऱ्या अळ्या पाहण्यासाठी गर्दी केली. याची माहिती मिळताच कृषी विभागाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अळीचा अमेरिकेतून सुरू झालेला प्रवास आफ्रिका ते औरंगाबाद असा झाला असून आता सांगलीच्या बुधागाव येथे या अळ्या पोहोचल्या आहेत. प्रामुख्याने मक्का या पिकावर मोठ्या प्रमाणावर आढळणारी ही अळी एका वेळी शंभर ते दोनशेच्या पटीत दोन हजारपर्यंत अंडी एकाच वेळी देते. त्यामुळे तिचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details