सांगली - महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पाटील यांच्या हस्ते साांगलीमध्ये शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील - मंत्री जयंत पाटील हेही वाचा -'कोरेगाव-भीमाप्रकरणी प्रकाश आंबेडकर हेच भिडे आणि एकबोटे यांना वाचवत आहेत'
सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणनंतर पोलीस परेड मैदानावर मोठ्या दिमाखात परेड सोहळा पार पडला. यावेळी सांगली जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ठ तपास करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी पाटील यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा -सांगलीत हुतात्मा जवानाच्या घरासमोर प्रजासत्ताक दिन साजरा, कुटुंबीयांच्याहस्ते ध्वजारोहण
तसेच महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल, असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. त्याचबरोबर ऑगस्टमधील पूरस्थिती, अवकाळी पाऊस यातून जिल्ह्यातील नागरीकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रशासनचा प्रयत्न असेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.