सांगली - मराठा समाजाने मोठे मोर्चे काढून राज्यात दहशत निर्माण केल्यामुळे राज्य सरकारही मराठा समाजाच्या दहशती खाली आहे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. त्यामुळे सरकारवर दडपण आणण्यासाठी ओबीसी समाजाचे शक्ती प्रदर्शन आणि मेळावा होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, लवकरच राज्यातील ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत ओबीसी महामेळावा सांगलीत होणार असल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
राज्य सरकार मराठा समाजाच्या दहशतीखाली - प्रकाश शेंडगे - pressure of Maratha community
मराठा समाजाने मोठे मोर्चे काढून राज्यात दहशत निर्माण केल्यामुळे राज्य सरकारही मराठा समाजाच्या दहशती खाली आहे, असा गंभीर आरोप ओबीसी नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.
![राज्य सरकार मराठा समाजाच्या दहशतीखाली - प्रकाश शेंडगे राज्य सरकार मराठा समाजाच्या दहशतीखाली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10534309-488-10534309-1612692495128.jpg)
राज्य सरकार मराठा समाजाच्या दहशतीखाली
राज्य सरकार मराठा समाजाच्या दहशतीखाली
राज्यात मराठा आरक्षणावरून खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयामध्ये स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसी समाजाच्या नोकरभरतीवर राज्यात स्थगितीची मागणी केली आहे. हा अत्यंत चुकीचा प्रकार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे.
अडीच वर्षांपासून नोकरभरती नाही..
आयोगाने मागासलेपणाचा अहवाल दिल्याने आता मराठा समाजाचे नेते उघडपणे ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी करत आहेत असेही ते म्हणाले. आज ओबीसी समाजाच्या 75 हजार मुलांची नोकरभरती गेल्या अडीच वर्षांपासून रखडली असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार मराठा समाजाच्या दहशतीखाली..
केवळ मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणावर स्थगिती आली आहे. पण मराठा समाजाचे नेते सर्व नोकरभरतीवर स्थगिती देण्याची मागणी राज्यसरकारकडे करत आहेत. तसेच मराठा समाजाकडून राज्यात मेळावे, मोर्चे काढून शक्ती प्रदर्शन करून एक दहशत निर्माण करण्यात आली. त्यामुळे या दबावाखाली राज्य सरकारने काढलेली नोकरभरती प्रक्रिया स्थगित केली. एक प्रकारे हे सरकार मराठा समाजाच्या दहशतीखाली आहे, असा गंभीर आरोप यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.
आता ओबीसीचेही दडपण..
या सरकारवर आता ओबीसीचे देखील दडपण निर्माण करण्यासाठी राज्यातील ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरणार आहे. त्यासाठी सांगलीत ओबीसी समाजाचा महामेळावा पार पडणार असून या मेळाव्याला ओबीसी नेते ज्यामध्ये मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यमंत्री दत्ता भरणे, संजय राठोड आदी प्रमुख ओबीसी नेते व समाज उपस्थित राहणार आहेत. असून रेकॉर्ड ब्रेक मेळावा यावेळी पार पडणार असल्याचे यावेळी प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे.