महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ST Driver Suicide : वेळेत पगार न मिळाल्याने एसटी चालकाची आत्महत्या; एसटी कर्मचाऱ्यांचा आरोप - भीमराव सूर्यवंशी

कवठेमहांकाळ येथील एका एसटी चालकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भीमराव सूर्यवंशी असे या एसटी चालकाचे नाव आहे. ते कवठेमहांकाळ एसटी आगारामध्ये चालक म्हणून सेवेत होते. आज सकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केली.

ST Driver Suicide
एसटी चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : Feb 16, 2023, 2:07 PM IST

Updated : Feb 16, 2023, 2:59 PM IST

एसटी चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

सांगली :भीमराव सूर्यवंशीग्रामीण मार्गावर ते चालक पदावर काम करत होते. त्यांच्या आत्महत्येच नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र राज्यात एस्टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळे वरती झाला नसल्याने आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच कवठेमहंकाळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला.

एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या :सुर्यवंशी यांचे सहकारी एसटी कर्मचारी जगन्नाथ माळी म्हणाले की, सूर्यवंशी हे चिंचाली यात्रेसाठी जाणार होते. पहाटे त्यांची ड्युटी होती. त्यामुळे वाहकाने घरी फोन लावला असता, त्यांच्या मुलाने वडिलांनी आत्महत्या केल्याची सांगितले. त्यामुळे आम्हाला ही गोष्ट समजली. सूर्यवंशी हे गेल्या चार दिवसापासून वारंवार आर्थिक अडचण असल्याचा आम्हाला सांगत होते. मुलीच्या लग्नाचे, मुलीच्या बाळंतपणाचे त्याचबरोबर शिक्षणाचा आणि घर खर्चाच्या दृष्टीने पैसे पुरत नाहीत आणि वेळेत पगार देखील होत नाही. त्यामुळे आर्थिक अडचण झाली आहे,असे ते सतत सांगत होते. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची भीमराव सूर्यवंशींप्रमाणेच अवस्था आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवून देण्यात आले. मात्र ते नियमित होत नाहीत. गेल्या आठ महिन्यांपासून पगार वेळेवर होत नाहीत.

पैशांची मोठी अडचण : पंधरा-पंधरा, वीस-वीस दिवस पगार होत नसल्याने अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे समोर पैशांची मोठी अडचण निर्माण होत आहे. पगार वेळेवर मिळत नसल्याने हात उसने देखील पैसे घ्यावे लागतात आणि कर्मचाऱ्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज, त्याचे हप्ते देखील भरण्यामध्ये त्यांना अडचण निर्माण होते. वेळेवर पैसे कोण देत नाहीत. त्यावेळी मोठ्या आर्थिक संकटामध्ये एसटी कर्मचारी आहेत.यामध्ये भीमराव सूर्यवंशी देखील होते आणि आर्थिक विवंचने मधूनच वेळेवर पगार होत नसल्याने सूर्यवंशी यांनी आत्महत्या आर्थिक केली आहे, असा आरोप एसटी कर्मचारी जगन्नाथ माळी यांनी केली आहे.

सर्व कर्मचाऱ्यांची अशीच अवस्था : भीमराव सूर्यवंशी यांच्या पश्चात पत्नीच्या मुली मुलगा आई वडील असे परिवार आहे. महाराष्ट्र शासनाने आता तरी एसटी कर्मचाऱ्यांच्याकडे लक्ष दिल पाहिजे, त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर शासनाने कारवाई करावी आणि या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी एसटी कर्मचाऱ्यांची माफक अपेक्षा आहे, अशी मागणी देखील यावेळी जगन्नाथ माळी यांनी व्यक्त केली आहे. एसटी चालकाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे सांगलीच्या एसटी आगारामध्ये खळबळ माजली आहे. त्याचबरोबर राज्य सरकार आणखी किती एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे? हा प्रश्न देखील एसटी कर्मचाऱ्यांमधून आता उपस्थित करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ते तातडीने होण्याबाबत राज्य सरकारकडून पावले उचलली जावीत, अशी मागणी देखील एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून आता पुढे आली आहे.



हेही वाचा :Ravikant Tupkar: सरकारच्या खुर्चीला आग लावणारे आंदोलन करू - रविकांत तुपकर

Last Updated : Feb 16, 2023, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details