महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत भाऊबीजेनिमित्त अनोख्या उपक्रमाचे आयोजन - bhai dooj celebration sangli

येडेनिपाणी येथील ग्रामस्थ गेल्या ३ वर्षांपासून भाऊबीज सणानिमित्त 'एक पणती बहिणीसाठी, एक पणती जवानांसाठी' असा उपक्रम राबवित आसते. यावर्षी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून प्राण गमावलेल्या नागरिकांसाठी प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली.

भाऊबीजनिमित्त येडेनिपाणी गावात अनोख्या उपक्रमाचे आयोजन

By

Published : Nov 1, 2019, 1:46 PM IST

सांगली - जिल्ह्यातील येडेनिपाणी गावात भाऊबीजेच्या निमित्ताने 'एक पणती बहिणीसाठी, एक दिवा जवानांसाठी, एक मशाल शेतकऱ्यांसाठी अन् 'एक क्षण महापूर आलेल्या ब्रम्हनाळ गावासाठी'चा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गावातील तरुण मित्र, ग्रामस्थ, महिला एकत्र येत कलेश्वर मंदिरात सायंकाळी पणत्या लावून श्रद्धांजली वाहिली.

प्राण गमावलेल्या नागरिकांसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील ग्रामस्थ गेल्या ३ वर्षांपासून भाऊबीज सणानिमित्त 'एक पणती बहिणीसाठी, एक पणती जवानांसाठी' असा उपक्रम राबवित आसते. यावर्षी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून प्राण गमावलेल्या नागरिकांसाठी प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली.

भाऊबीजनिमित्त येडेनिपाणी गावात अनोख्या उपक्रमाचे आयोजन

हेही वाचा - मिरजेत क्षुल्लक वादातून पतीकडून पत्नीचा खून, गुन्ह्याची दिली कबुली

यावेळी येडेनिपाणी गावातील कल्लेश्वर मंदिरात विविध क्षेत्रातील ग्रामस्थ महिला व तरुणांनी उपस्थित राहून शेतकरी, बहीण आणि जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी गावातील माजी सैनिक अशोक पाटील, प्रविण पाटील, संजय पाटील यांच्या हस्ते पणत्या लावून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तर सरपंच डॉ.सचिन पाटील, मोहन पाटील, सी.एच.पाटील, प्रा. आकाश पाटील, सचिन यादव, शंकर पाटील यांनी सर्वांप्रती मनोगत व्यक्त केले. तर राष्ट्रगिताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हेही वाचा - सांगलीमध्ये दिवाळी निमित्त पार पडली मेंढ्या पळवण्याची अनोखी स्पर्धा

ABOUT THE AUTHOR

...view details