महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'होम आयसोलेशन'मधील रुग्णांचीही घेतली जाणार विशेष काळजी

सांगली महापालिका क्षेत्रात होमआयसोलेशनच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आता डॉक्टर आणि परिचारिकांचे पथक कार्यरत असणार आहे. पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून गुलाबराव पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाचे 60पेक्षा अधिक जणांचे पथक पालिकेच्या मदतीला हजर झाले आहे.

पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनचा पुढाकार
पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनचा पुढाकार

By

Published : Apr 30, 2021, 10:41 PM IST

सांगली - सांगली महापालिका क्षेत्रात होम आयसोलेशनच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आता डॉक्टर आणि परिचारिकांचे पथक कार्यरत असणार आहे. पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून गुलाबराव पाटील होमिओपॅथी महाविद्यालयाचे 60पेक्षा अधिक जणांचे पथक पालिकेच्या मदतीला हजर झाले आहे.

'आता होमआयसोलेशनच्या रुग्णांचीही विशेष काळजी'
आता गृहअलगीरण रुग्णांचीही घेतली जाणार काळजीसांगलीच्या पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन महापालिकेच्या मदतीला आले आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजचे डॉक्टर, शिकावू विद्यार्थी, नर्सेस हे आता होम आयसोलेशनच्या रुग्णांची काळजी घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहेत. शुक्रवारपासून कॉलेजच्या 61 जणांची टीम महापालिका क्षेत्रात कार्यरत झाली असून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे.आयुक्तांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभया टीमकडून गृहविलगीकरणमध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी घेण्याबरोबर त्या व्यक्तींची काळजी घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि वैद्यकीय मदतही केली जाणार आहे. हनुमान नगर आरोग्य केंद्रामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात या अभियानाचा शुभारंभ मनपा आयुक्त नितीन कापडणीस आणि गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष व काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.कोरोना रुग्ण संख्येत वाढ कायमसध्या महापालिका क्षेत्रात 1 हजार 500पेक्षा अधिक कोरोना रुग्ण होम आयसोलेशन उपचार घेत आहेत. याशिवाय दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. यामध्ये सौम्य लक्षणे किंवा काहीच लक्षणे नसणारे पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. एका-एका प्रभागात 125 ते 150च्या आसपास होम आयसोलेशनची संख्या असल्याने आशा वर्कर यांना सर्वत्र पोहोचणे शक्य होत नाही. त्यातच अनेक ठिकाणी होमआयसोलेशन व्यक्तीकडून नियमांचे पालन होत नसल्याचे प्रकार समोर येत होते. त्यामुळे पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन आणि स्व. गुलाबराव पाटील होमिओपॅथी कॉलेजकडून होमयसोलेशनसाठी त्यांचे डॉक्टर, नर्सेस तसेच शिकावू विद्यार्थी हे महापालिकेच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामुळे होमयसोलेशन असलेल्या प्रत्येक रुग्णांवर दैनंदिन लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.काळजी आणि मार्गदर्शन करण्याचे कामयावेळी बोलताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व गुलाबराव पाटील महाविद्यालयाचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील म्हणाले की, प्रत्येक प्रभागात आमचे 2 डॉक्टर, 2 नर्सेस आणि अन्य स्टाफ यांच्याकडून गृहभेटी देऊन होम आयसोलेशन असणाऱ्या व्यक्तीची काळजी घेतली जाईल, तसेच लक्षही ठेवले जाईल. याचबरोबर आमच्या कॉल सेंटरमधून त्यांना दिवसातून तीन वेळा कॉलसुद्धा जाईल. महापालिका क्षेत्रातील मनपाच्या 10 दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात आमचे 21 डॉक्टर आणि 20 नर्सेस व अन्य असा 61 जणांचा स्टाफ सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असणार आहे. आमच्या स्टाफसोबत एक आशा वर्करसुद्धा असणार आहे. याचबरोबर होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांना फाऊंडेशनकडून व्हिटॅमिन सी, जे आणि अर्सनिक अल्बमचा समावेश असणारे किटसुद्धा मोफत दिले जाणार आहे.हेही वाचा -शैक्षणिक वर्ष संपल्याचे अखेर जाहीर, शिक्षण संचालकांनी काढले सुट्टीचे परिपत्रक

ABOUT THE AUTHOR

...view details