सांगली- पैशासाठी एका दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळवा तालुक्यातील चिकूर्डे येथील ही घटना असून विकलेल्या म्हशीच्या पैशाच्या वादातून दारूच्या नशेत वडिलांचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. हरी पाटील (वय ८१ वर्षे) असे मृत बापाचे नाव तर, लक्ष्मण पाटील असे मुलाचे नाव आहे. कुरुळप पोलिसांनी लक्ष्मण पाटील त्याला अटक केली आहे.
धक्कादायक! मुलानेच केला वृद्ध बापाचा खून; वाळवा तालुक्यातील घटना - Sarfaraj Sanadi
पैशासाठी एका दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे वृद्ध बापाचा दारुड्या मुलाने निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. चिकुर्डे येथील टाकळी वसाहतीत राहणाऱ्या लक्ष्मण याला बऱ्याच वर्षांपासून दारूचे व्यसन होते. त्यामुळे वेळोवेळी आई-वडिलांना मारहाण करत होता. तर हरी पाटील हे गेली चार वर्षांपासून लकवा (अर्धांगवायू) झाल्याने अंथरुणात खिळून होते. पती आजारी असल्याने पत्नी ताराबाई यांनी घरातील म्हैस विकली होती. त्यातील १० हजार देण्याची लक्ष्मणने आईकडे मागणी केली होती. मात्र, आईकडून पैसे देण्यात आले नसल्याच्या रागातून लक्ष्मण याने दारू पिऊन वडील अंथरुणावर झोपले असताना. लाकडी दांडक्याने डोक्यात व अंगावर मारहाण करून जखमी केले. याबाबतची माहिती मिळताच कुरळप पोलिसांना तातडीने घटनास्थळी दाखल होत, जखमी हरी पाटील यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना हरी पाटील यांचा मृत्यू झाला आहे. तर या प्रकरणी कुरळप पोलिसांनी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करत लक्ष्मण पाटील याला ताब्यात घेत.
लक्ष्मण याचे लग्न झाले, असून दारूच्या व्यसनामुळे व सततच्या भांडणाला वैतागून, लक्ष्मणाची पत्नी त्याला सोडून माहेरी राहत आहे. तो दारूच्या पैशासाठी वेळोवेळी आई-वडिलांना तो मारहाण करत होता. यावरून बऱ्याचवेळा शेजाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्नही केला होता.