महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वकिलाची आईसह आत्महत्या, आईचा कृष्णा नदीत तर मुलाचा रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

सुनील अग्रवाल व पुष्पा अग्रवाल असे आत्महत्या केलेल्या आई-मुलाचे नावे आहेत. यानंतर आईचा कृष्णा नदीत तर मुलाचा रेल्वे रुळावर मृतदेह सापडला आहे.

वकिलाची आईसह आत्महत्या

By

Published : May 2, 2019, 7:05 PM IST

सांगली- मिरजेतील एका वकिलाने आपल्या आईसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सुनील अग्रवाल व पुष्पा अग्रवाल असे आत्महत्या केलेल्या आई-मुलाचे नावे आहेत. यानंतर आईचा कृष्णा नदीत तर मुलाचा रेल्वे रुळावर मृतदेह सापडला आहे.

आत्महत्या केलेल सुनील अग्रवाल

मिरजेतील वकील सुनील अग्रवाल (वय ४७) आणि त्यांची आई पुष्पा अग्रवाल (वय ७०) या आई - मुलाचे आज वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह सापडले आहेत. ३० तारखेपासून मिरजेतील ब्राम्हणपुरीमध्ये राहणारे हे दोघेजण बेपत्ता होते.

१ मे रोजी मिरजेच्या कृष्णाघाट स्मशानभूमीजवळ वकीलाचे चिन्ह असलेली एक्सेस मोटारसायकल बेवारस अवस्थेत नागरिकांना आढळली. त्याशेजारी महिलेची चप्पलही होती. त्यावरून कोणी महिलेने आत्महत्या केली आहे, का अशी शंका आली. यामुळे गांधी चौकी पोलिसांना याची माहिती देऊन या नंबरची दुचाकी कोणाची आहे याचा शोध घेतला. त्याचबरोबर नदीच्या पात्रातही पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर दुपारी महिलेचा मृतदेह नदीत तरंगत असताना दिसला. त्यानंतर पुष्पा अग्रवाल यांचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले तर आज सकाळी कृष्णा घाट रोडवरील रेल्वे रुळावर सुनील अग्रवाल यांचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत मिरज रेल्वे पोलिसात व गांधी चौकी पोलिसात दोघांची आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आई व मुलाच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे मिरजेत हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details