महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घड्याळ बंद झालंय, आता काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करा - स्मृती इराणी - maharashtra assembly elections

सांगली मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ सोमवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना घड्याळ तर केव्हाच बंद झाले आहे, आता काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करा, असे आवाहन करत राष्ट्रवादीवर इराणी यांनी टीका केली.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

By

Published : Oct 14, 2019, 10:20 PM IST

सांगली - घड्याळ तर केव्हाच बंद झाले आहे, आता काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करा असे आवाहन करत राष्ट्रवादीवर भाजपच्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी टीका केली. सांगलीमध्ये आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

जाहीर सभेत बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी


सांगली मतदारसंघातील भाजप उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ सोमवारी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची जाहीर सभा पार पडली. शहरातील मारुती चौक येथे आयोजित या सभेसाठी खासदार संजयकाका पाटील, उमेदवार सुधीर गाडगीळ, महिला आघाडी उपाध्यक्ष निती केळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी अमेटीमध्ये जमीन हडप केली आहे. ते महाराष्ट्रात शेतकऱ्यांविषयी बोलतात, पण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी लपवू शकत नाही. तसेच, शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यास काँग्रेसने सांगितले तो दिवस आजही आठवत आहे, असे इराणी म्हणाल्या. तसेच आता दिवाळी येणार आहे, त्यामुळे सगळेजण आपल्या घरातील सफाई करतात, तसे 21 ऑक्टोबर रोजी सफाई करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ कधीच बंद झाले आहे, आता काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करा असे आवाहन यावेळी स्मृती इराणी यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details