सांगली- शहरातील जिल्हा कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील ६३ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे.तर, यापैकी एक कैदी जामिनावर सुटल्याचा प्रकार समोर आला आहे.त्यामुळे कारागृह जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.
सांगलीच्या जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव; 63 कैद्यांना कोरोनाची लागण - 63 prisoners corona positive
सांगली जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा कारागृहात ही ३ दिवसांपूर्वी टेस्ट घेण्यात आली होती. ९२ कैद्यांची तपासणी त्यावेळी करण्यात आली होती, त्यापैकी तब्बल ६३ बंदिवानांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ज्यामुळे कारागृह प्रशासन हादरून गेले आहे.
सांगली जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.पालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर सर्व स्तरावर कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येत आहे. सांगली शहरात असणाऱ्या जिल्हा कारागृहात ही ३ दिवसांपूर्वी टेस्ट घेण्यात आली होती. ९२ कैद्यांची तपासणी त्यावेळी करण्यात आली होती. रविवारी रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाले. एकाच वेळी कारागृहातील तब्बल ६३ बंदिवानांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ज्यामुळे कारागृह प्रशासन हादरून गेले आहे.
अहवाल येताच जिल्हा आणि कारागृह प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपयोजना सुरू केल्या आहेत. ज्यात पॉझिटिव्ह आलेल्या कैद्यांना कारागृहात क्वारंटाइन केले आहे. ५० वर्षाच्या वरील कैद्यांचे तात्पुरते अलगीकरण करण्यात आले असून त्यांना अन्यत्र हलवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे टेस्ट झालेला एक कैदी हा नुकताच जामीनावावर सुटला असून त्याचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून त्या कैद्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला सर्वात चिंतेची बाब म्हणजे कारागृहात ३०० हुन अधिक कैदी आहेत. पॉझिटिव्ह आलेले सर्व कैदी हे अन्य कैद्यांसोबत एकत्र वावरत असल्याने कारागृहात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची मोठी भीती आहे.