महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय; पोलीस निरीक्षकासह 6 जणांना अटक - वेश्या व्यवसायावर छापा

कर्नाळ रोडवरील हॉटेल रणवीर याठिकाणी छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू होता. याची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी हॉटेल रणवीरवर छापा टाकत हाय प्रोफाईल वेश्या अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी हॉटेल चालकासह ग्राहकांना अटक केली आहे.

सांगलीत हॉटलमध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय
सांगलीत हॉटलमध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय

By

Published : Jan 29, 2021, 12:37 PM IST

Updated : Jan 29, 2021, 12:46 PM IST

सांगली - शहरातील कर्नाळ रोडवरील एका हॉटेल मध्ये हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरू होता. या ठिकाणी सांगली पोलिसांकडून छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये आटपाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. तसेच या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिलांनाही ताब्यात घेत सुटका केली आहे.

सांगलीत हॉटलमध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय
पोलीस निरीक्षक अटकेत..सांगली शहरातल्या कर्नाळ रोडवरील हॉटेल रणवीर याठिकाणी छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू होता. याची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनी हॉटेल रणवीरवर छापा टाकत हाय प्रोफाईल वेश्या अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी हॉटेल चालकासह ग्राहकांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये आटपाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. अरुण देवकर असे त्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.


हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, राजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजित पंडित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासर्वांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Last Updated : Jan 29, 2021, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details