महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत कोरोनामुळे एकाचा मृत्यू, तर १० जणांना कोरोना लागण - सांगली कोरोना न्यूज

बुधवारी दिवसभरात सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १० ने वाढला. यामुळे जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या ४७ वर पोहचली आहे. आतापर्यंत ९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४८ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत .तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Sangali corona update
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज

By

Published : May 28, 2020, 7:54 AM IST

सांगली- जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. तर बुधवारी दिवसभरात एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण मुंबईहून आले आहेत. या नवीन रुग्णांसह एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४७ झाला आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहेत. मुंबईहून येणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात कोरोना लागण होत आहे. इन्स्टिट्यूट क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींचे अहवाल हे पॉझिटिव्ह येत आहेत. बुधवारी दिवसभरात एकूण दहा नवे कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. सकाळी चार जणांना कोरोनाचे लागण झाली होती. तर रात्री उशिरा आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

यामध्ये आटपाडी तालुक्यातील कामतमधील एक ५४ वर्षीय महिलेला लागण झाली आहे. तिच्या पतीला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तर कडेगाव तालुक्यातील खेराडे वांगी मधील ४५ वर्षीय महिला, वाळवा तालुक्यातील वाटेगाव मधील ३४ वर्षीय पुरुष तर ठाणापुडे मधील २१ वर्षीय तरूण,शिराळा तालुक्यातील चिंचोली मधील ४३ वर्षीय पुरुष आणि तासगाव तालुक्यातील शिरगाव मधील ६२ वर्षीय पुरुष अशा सहा जणांचा समावेश आहे. हे सर्व जण मुंबईवरून आले आहेत. त्यांना प्रशासनाकडून क्वारंटाईन करण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.

तर शिराळा तालुक्यातील मोहरे येथील ५० वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्य झाला आहे. संबंधित कोरोनाबाधितावर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

तर बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १० ने वाढला. यामुळे जिल्ह्यांत कोरोनाबाधितांची संख्या ४७ वर पोहचली आहे. आतापर्यंत ९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४८ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत .तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details