सांगली - कौटुंबिक वादातून मेव्हण्याने भाऊजीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सांगली शहरामध्ये घडली ( Sisters husband brutally murdered ) आहे. जावेद गवंडी, वय वर्ष 45 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव ( Jawed Gawandi Murder Case ) आहे. बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणातून ( Murder Due to Family Dispute ) भावाने ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
मेव्हण्यानेचं केला निर्घृण खून :सांगलीतल्या राजीव गांधी झोपडपट्टीमध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कौटुंबिक वादातून निर्घृण खून करण्यात आला आहे. पोटात, मानेवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार करून हा खून करण्यात आला आहे. जावेद नूरमहंमद गवंडी (वय ४५) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. सदरची घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे पथकासह तातडीने दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.