सांगली - कडेगाव नगरपंचायतीमध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराची चौकशीच्या मागणीसाठी कडेगावमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. संघर्ष समिती आणि राष्ट्रवादीच्या वतीने थेट कडेगाव तहसील कार्यलयाच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्यात आले.
तहसील कार्यालयाच्या छतावर ठिय्या आंदोलन..
कडेगाव नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे नेते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची सत्ता आहे. या नगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार आणि भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप संघर्ष समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. सदर प्रकरणाबाबत चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज संघर्ष समिती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शोले स्टाईल आंदोलन केले आहे. थेट कडेगाव तहसील कार्यालयाच्या टेरेसवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.
कडेगाव नगरपंचायतीमधील भोंगळ कारभाराच्या चौकशीसाठी शोले स्टाईल आंदोलन - कडेगाव नगर पंचायत
कडेगाव नगरपंचायतीमध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराची चौकशीच्या मागणीसाठी कडेगावमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. संघर्ष समिती आणि राष्ट्रवादीच्या वतीने थेट कडेगाव तहसील कार्यलयाच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्यात आले.
टेरेसवर ठिय्या मारत कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. कडेगाव नगरपंचायतीच्या चौकशीची मागणी करत थेट इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले होते. अखेर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कडेगाव नगरपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र चौकशी सुरू झाली नाही, तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.