सांगली -कुटुंबाला कोरोना झाल्यामुळे वडिलांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार सांगलीतील दुधगाव येथे घडला आहे. वडिलांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कोरोनाग्रस्त मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील दुधगाव येथील उपाध्ये कुटुंबावर ही शोककळा पसरली आहे.
धक्कादायक! कुटुंबाला कोरोना झाल्याने वडिलांची आत्महत्या, तर मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू - सांगली आत्महत्या लेटेस्ट न्यूज
कुटुंबातील पाचही जण कोरोनाबाधित आढळल्याने अशोक उपाध्ये अस्वस्थ होते. आपले कुटुंब कोरोनाशी कसा सामना करणार, याशिवाय आर्थिक भार कसा पेलायचा हे प्रश्न त्यांच्या समोर होते. याच विवंचनेतून अशोक उपाध्ये यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
जैन बस्ती या ठिकाणी अशोक उपाध्ये हे पंडित म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना व त्यांच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुले आणि सून यांना कोरोना लागण झाली होती. तर कुटूंबातील लहान मुलीची चाचणी मात्र निगेटिव्ह आली होती. यापैकी उपाध्ये यांचा मुलगा दीपक उपाध्ये याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुटुंबातील पाचही जण कोरोनाबाधित आढळल्याने अशोक उपाध्ये अस्वस्थ होते. आपले कुटुंब कोरोनाशी कसा सामना करणार, याशिवाय आर्थिक भार कसा पेलायचा हे प्रश्न त्यांच्या समोर होते. याच विवंचनेतून अशोक उपाध्ये यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
अशोक उपाध्ये यांच्या घटनेनंतर कुटुंबावर आणखी एक एक दुःखाचा डोंगर कोसळला. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दीपकचाही मृत्यू झाल्याची बातमी उपाध्ये कुटुंबाला मिळाली. कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्यामुळे उपाध्ये कुटुंबावर मोठी शोककळा पसरली असून या घटनेने दुधगावही हादरले आहे.