सांगली- नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक होत आहे. सांगलीच्या इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' नामकरण करण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेने इस्लामपूर नगरपालिकेवर सोमवारी (दि. 6) धडक मोर्चा काढला होता. या मागणीचे निवेदन नगराध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
शहर नामांतरांसाठी शिवसेना आक्रमक ...
राज्यातील शहरांच्या नामांतराचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर येऊ लागला आहे. याबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगलीच्या इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' नामकरण करण्याची मागणी करत शिवसेनेने इस्लामपूर नगर पालिकेवर धडक दिली. यावेळी वाद्यांच्या गजरात, भगवे फेटे घालून आणि हातात भगवे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना नामांतराच्या मागणीचे निवेदन दिले आहे.