सांगली - NRC आणि CAA कायद्याला विरोध करणारऱ्या भारतीय हिंदूंना वंधत्व आणि नपुंसकता आली आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. NRC आणि CAA च्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानने शहरात मोर्चा काढला. याप्रसंगी भिडेंनी या कायद्यांना विरोध करणाऱ्या हिंदूंवर टीकेची झोड उठवली. या मोर्चात भाजपाच्या खासदार आणि आमदारांनी सहभाग घेतला होता.
राम मंदिरापासून निघालेल्या मोर्चाची सांगता मारूती चौकात जाहिर सभेने करण्यात आली. यावेळी, उपस्थितांना संबोधित करताना भिडे म्हणाले,"भारताला गांधी बाधा रोगाने ग्रासले आहे. हिंदू समाजात अपार नपुंसकता आणि राष्ट्रीयत्वाचा अभाव आहे"