सांगली - स्त्री संगाबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन अडचणीत सापडलेल्या इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ संभाजी भिडेंचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान सरसावले आहे. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवप्रतिष्ठानकडून देण्यात आला आहे.
इंदोरीकर महाराजांना संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानने पाठिंबा जाहीर केला आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी याबाबत माहिती दिली. आपल्या कीर्तनातून इंदोरीकर महाराज हे समाज प्रबोधनाचे काम करत आहेत. एका शब्दाचा विपर्यास करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप शिवप्रतिष्ठानकडून करण्यात आला आहे.