सांगली - आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विजयाने खानापूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार बाबर यांनी विटा शहर वगळता मतदारसंघाच्या सर्वच भागात मताधिक्क्य घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. आमदार अनिलभाऊ बाबर यांना 1 लाख 16 हजार 974 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना 90 हजार 683 इतकी मते मिळाली. आमदार बाबर हे तब्बल 26 हजार 291 मतांनी विजयी झाले आहेत. आमदार बाबर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना सलग दुसर्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करत इतिहास घडवत करू या जागर पुन्हा बाबर असा नारा दिला.
आज गुरूवारी सकाळी 8 वाजता येथील शासकीय धान्य गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शंकर बर्गे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत नागेवाडी जिल्हा परिषद गटात आमदार बाबर यांनी मताधियय घेतले दुसर्या फेरीत देखिल आमदार बाबर हेच आघाडीवर होते. त्यानंतर माजी आमदार पाटील यांचे प्राबल्य असलेल्या विटा शहरात पाटील यांनी नाममात्र मताधियय घेतले. त्यानंतर चौथ्या फेरीपासून अठराव्या फेरीअखेर आमदार बाबर यांनी प्रत्येक फेरीत दिड ते दोन हजार मतांचे मताधिक्क्य घेत आघाडी कायम ठेवली. टपाली मतदानात देखिल आमदार बाबर यांना 574 मतांचे मताधियय मिळाले. आमदार बाबर यांना नागेवाडी जिल्हा परिषद गट, भाळवणी जिल्हा परिषद गट, तासगाव तालुययातील विसापूर सर्कल आणि लेगरे जिल्हा परिषद अशा सर्वच भागात मताधियय मिळाले तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना विटा शहरात सुमारे 5 हजार 600 चे मताधिक्क्य मिळाले. तरी देखिल आमदार बाबर यांना आटपाडी तालुक्याची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी 11 व्या फेरीअखेर सुमारे 8 हजार 582 मतांचे मताधियय मिळाले होते. आटपाडी तालुययात आमदार बाबर यांना सुमारे 17 हजार 709 इतके मताधिक्क्य मिळाल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळे बाबर यांच्या विजयात आटपाडी तालुक्याने मोठे योगदान दिल्याचे स्पष्ट होत आहे.