महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले - sagnli latest news

सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त दौऱ्यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजपाच्या वतीने देण्यात येणारे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडून स्वीकारण्यात आले नसल्याचा आरोप करत निषेध नोंदवला. तसेच रस्त्यावर ठिय्या करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर शिवसेनेने प्रत्युत्तरात जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुख्यमंत्री दौऱ्या
मुख्यमंत्री दौऱ्या

By

Published : Aug 2, 2021, 3:27 PM IST

सांगली -सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त दौऱ्यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. भाजपाच्या वतीने देण्यात येणारे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडून स्वीकारण्यात आले नसल्याचा आरोप करत निषेध नोंदवला. तसेच रस्त्यावर ठिय्या करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर शिवसेनेने प्रत्युत्तरात जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान शिवसेना-भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

दरम्यान, यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली होती. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या करत, जोपर्यंत मुख्यमंत्री निवेदन स्वीकारत नाही, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नसल्याची भूमिका जाहीर केली. मात्र काही वेळाने पोलिसांनी भाजपा आणि शिवसेनेच्या आंदोलकांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्त दौऱ्यावर आहेत. सांगलीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हरभट रोड या ठिकाणी पुरग्रस्त व्यापारी आणि शिष्टमंडळ यांची भेट घेण्यासाठी वेळ राखीव ठेवला होता. दरम्यान या ठिकाणी भाजपाच्या वतीने देण्यात येणारे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडून स्वीकारण्यात आले नसल्याचा आरोप करत भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आणि रस्त्यावर ठिय्या केला. त्यानंतर हा सर्व गोंधळाचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा -मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावलेल्या ‘अदानी एअरपोर्ट' नामफलकाची शिवसेनेकडून तोडफोड

ABOUT THE AUTHOR

...view details