महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातून एसटीची सेवा सुरू करा; नागरिकांची मागणी

शिराळा तालुक्यातील मुंबईसाठी एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खासगी प्रवासी बस चालकांकडून मनमानी पद्धतीने तिकीटाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे एसटी महामंडाळे वाकुर्डे मुंबई ही बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी शिराळा तालुक्यातून होऊ लागली आहे.

By

Published : Nov 16, 2020, 7:25 PM IST

डोंगरी भागातून एसटीची सेवा सुरू करा
डोंगरी भागातून एसटीची सेवा सुरू करा

शिराळा(सांगली)- तालुक्यातील उत्तर भागातून मूबईला धावणारी एकतरी एसटी बस सूरू करावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. शिराळा उत्तर भागात 20 गावे आहेत. या गावचे अनेकजण मुंबईला कामाला आहेत. मात्र, काही वर्षापूर्वी सुरू असलेली एसटी बस सेवा सध्या बंद खासगी बसमुळे बंद पडली आहे. मात्र, खासगी प्रवासी बस चालकांकडून मनमानी पद्धतीने तिकीटाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे एसटी महामंडाळे वाकुर्डे मुंबई ही बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी शिराळा तालुक्यातून होऊ लागली आहे.

खासगी बस चालकांची मनमानी-

वाकुर्डे या गावातील घरटी एक तरी माणूस कामधंद्यासाठी मुंबईला आहे, या परिसरातील किमान 80 हजार लोक आहेत जे सातत्याने मुंबईकडे प्रवास करतात आणि मुंबईकडून गावी येतात. यापूर्वी एसटी महामंडळाची वाकूर्डे मुंबई ही बस प्रवासी सेवा देत होती. मात्र, कालांतराने ती सेवा बंद पडली आणि खासगी बसच्या सेवा सुरू झाल्या आहेत. सध्या खासगी बस सेवाकडून रोजच दर पत्रक बदलण्यात येत असून प्रवाशांची लूट करत आहेत. यातच कित्येकवेळा या खासगी बसची सेवा अचानक रदद्ही केली जाते त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तिकीटाचे जास्त दर आकारणी-

या खासगी बस चालकांची मनमानी करत आता प्रवाशांकडून जास्त पैसे लूटण्याचा धंदा सुरू केला आहे. प्रवाशांना रात्री अकरा वाजेपर्यंत बस सुटे पर्यंत कमी दर सांगितला जातो आणि बसमध्ये बसल्यानंतर मोठी रक्कम मागीतली जाते, अशीवेळी साहित्यासह आलेले प्रवाशी रात्रीच्या वेळी मजबुरीने मागील तेवढी रक्कम देतात. ही मनमानी वसुली प्रवाशांसाठी डोकेदुखी आणि नुकसानकारक ठरली आहे.

या सर्व प्रकारामुळे एसटी महामंडळाकडून मुंबईसाठी बससेवा सुरू व्हावी अशी मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details