महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीमध्ये दिवाळी निमित्त पार पडली मेंढ्या पळवण्याची अनोखी स्पर्धा - सांगली मेंढ्या पळवण्याची स्पर्धा

झरे गावात दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी मेंढ्या पळवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना रंगरंगोटी करून स्पर्धेत सहभागी होतात.

मेंढ्या पळवण्याची अनोखी स्पर्धा

By

Published : Oct 29, 2019, 8:08 PM IST

सांगली - दिवाळी निमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात मेंढ्या पळवण्याची अनोखी स्पर्धा पार पडली. शेकडो वर्षांपासून झरे येथे ही परंपरा जोपासली जात आहे.

दिवाळी निमित्त मेंढ्या पळवण्याची अनोखी स्पर्धा

हेही वाचा - सोलापुरात बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाची मिरवणूक

झरे गावात दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी मेंढ्या पळवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना रंगरंगोटी करून स्पर्धेत सहभागी होतात. पळत येऊन जी मेंढी उंच उडी मारून बांधलेल्या तोरणाला स्पर्श करते, त्याला प्रथम क्रमांक दिला जातो. मेंढ्यांची ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी संपूर्ण गावासह पंचक्रोशीतील रहिवासी गर्दी करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details