सांगली -ज्या लोकांना पुराचा फटका बसला आहे, अशांना लवकरात लवकर सर्वोतोपरी मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ज्या ठिकाणी पूर येणार नाही, अशा ठिकाणी या लोकांची कायमस्वरुपी व्यवस्था करावी, अशी मागणीही पवारांनी केली आहे. सांगलीमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
राज्य सरकारने पूरग्रस्तांची कायमस्वरुपी व्यवस्था करावी - शरद पवार - सांगली आणि कोल्हापुर
राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील नागरिकांना तत्काळ सर्व प्रकारची मदत करायला हवी. पूरग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावे. या पुरात सांगली आणि कोल्हापुरमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शरद पवार
पवार म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील नागरिकांना तत्काळ सर्व प्रकारची मदत करायला हवी. पूरग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करावे. या पुरात सांगली आणि कोल्हापुरमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतात काम करणाऱ्या मजुरांनांही राज्य सरकारने आधार देण्याची गरज असल्याचेही त्यांनी या ठिकाणी सुचित केले.
अनेक ठिकाणी मदत न मिळाल्याची तक्रार नागरिक करत आहेत. या पुरात दुकानदारांचे, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून, हे अभूतपूर्व संकट असल्याचे पवार म्हणाले.
Last Updated : Aug 10, 2019, 11:53 PM IST