सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने शबे-बरात घरातच साजरी करावे, असे आवाहन मिरजेत मुस्लीम धर्मीय धर्मगुरू आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले. कोणीही घराबाहेर न पडत घरातच नमाज अदा करावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
शब-ए-बारात घरातच साजरा करा!... हेही वाचा-बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व धर्मियांचे कार्यक्रम एकत्र येऊन साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुस्लिम समाजामध्ये शब-ए-बारातची मोठी परंपरा असून या दिवशी रात्री स्मशानात नमाज पडण्याची प्रथा आहे. तसेच संपूर्ण रात्र जागरण करुन देवाची भक्ती करण्याचा ही रात्र असते.
कोरोनामुळे शब-ए-बारातची सण एकत्र येऊन साजरा केला जाणार नाही. असा निर्णय सांगली, मिरजेतील मुस्लीम धर्मीय धर्मगुरूंनी घेतला. तर तसे आवाहन मुस्लीम समाजाच्या मौलवींनी केले. पोलिसांनी मौलवी यांना घेऊन मुस्लीम बहुल भागात याबाबत जनजागृती करण्याचे काम केले. सकाळी अनेक भागात मौलवी आणि पोलिसांनी मुस्लीम समाज बंधावांना एकत्र येऊन शबे -ए- बरात साजरा करू नये, घरातच नमाज पठण करुन देवाची भक्ती करण्याचे आवाहन केले.