सांगली -क्रेन अंगावर गेल्याने एक 70 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मिरजच्या टाकळी रस्त्यावरील सुभाषनगर येथे घडली आहे. रस्ता ओलांडताना हा अपघात झाला आहे. हैबती तय्याप्पा जाधव, असे या वृद्धाचे नाव आहे.
क्रेनखाली चिरडून मृत्यू -

नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू असून या कामासाठी मिरजच्या तासगाव फाटा येथून टाकळीकडे गुरुकृपा क्रेन सर्व्हिस या कंपनीचा क्रेन निघाला होता. यावेळी क्रेन हा सुभाषनगर चौकात आला असता, याठिकाणी हैबती तय्याप्पा जाधव हे काठी घेऊन रस्ता ओलांडत होते. यावेळी क्रेन त्यांच्या अंगावरून गेली. ज्यामध्ये जाधव हे चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सिराज अन्सारी रा. बिहार या क्रेन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - मोदींसाठी जवान, शेतकरी नाही तर त्यांचे उद्योपती मित्रच देवासमान - राहुल गांधी