सांगली- शिराळा तालुक्यातील देववाडी येथे वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे बांबूचे बेट मेंढ्यांच्या कळपावर पडून ७ मेंढ्या ठार झाल्या आहेत. या घटनेत १४ मेंढ्या जखमी झाल्या. या घटनेने मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाने बांबूचे बेट कोसळले, 7 मेंढ्या ठार - मेंढ्या
अवकाळी पावसामुळे बांबूचे बेट कोसळून ७ मेंढ्या ठार झाल्याने मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मेंढ्या ठार झाल्याने मेंढपाळाने हळहळ व्यक्त केली.
वाळवा तालुक्यातील चिकुर्डेमधील हा मेंढपाळ असून सोन्या धनगर असे त्याचे नाव आहे. काल तो आपल्या मेंढ्या चरण्यासाठी देववाडी येथे गेला होता. बुधवारी दुपारी आलेल्या वादळी वार्याच्या पावसाने काटेरी बेट उन्मळून मेंढ्यांच्या कळपावर पडले. यावेळी त्याबेटाखाली सात मेंढ्या ठार तर चौदा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे मेंढपाळाचे अंदाजे एक लाख रुपयाचे नुसकान झाले आहे. बेट बाजूला करण्यासाठी देववाडी येथील पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी आणि ग्रामस्थांनी जेसीबीने उचलून त्य खालील मेंढ्या बाजूला केल्या. यावेळी येथील पोलीस पाटलांसह वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी पाटील यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे.