सांगली :मिरज शहरात मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असणाऱ्या ख्वाजा वसाहत जवळ येथे हा प्रकार घडला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर (ZP Member Brahmanand Padalkar) यांनी बेकायदेशीरपने जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने ही सात मिळकती पाडल्याचा आरोप (accused of demolishing property) नागरिकांनी केला आहे. ज्यामध्ये रस्त्या शेजारील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस,एक घर, पान शॉप अशा सात मिळकती मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास पाडण्यात आली आहेत.
नागरिकांचा पडळकरांवर आरोप :मध्यरात्री 5 ते 6 जेसीबीच्या साह्यायाने ही दुकानं आणि घर पाडली आहेत. हजार लोकांची टोळी घेऊन जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर आले होते,असा आरोप नागरिकानी केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरी याठिकाणी अतिक्रमण पाडण्याच्या या घटनेमुळे नागरिकांच्या मधून संताप व्यक्त करण्यात आला आणि नागरिकांनी रस्त्यावर उतरत जेसीबी दगड देखील केली ज्यामध्ये जेसीबीच्या दर्शनी भागाच्या काचा फुटल्या आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात आता तणावाचे वातावरण आहे.