सांगली - भरधाव ट्रक रस्त्याकडेला असलेल्या ८ ते १० दुकानगाळ्यात धुसल्याने दुकानगाळे भुईसपाट झाले. मिरजे जवळच्या बेडगमध्ये ही घटना घडली. मद्यधुंद ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मद्यपी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले, रस्त्याकडेची दुकानगाळे केली भुईसपाट - मिरज
मिरज तालुक्यातील बेडग येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकान गाळयात भरधाव ट्रक घुसल्याने भीषण अपघात घडला आहे. बेडग-मंगसुळी रस्त्यावर कर्नाटक कडून येणारा एक ट्रक अचानक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विजेच्या खांबाला जोरात धडकला आणि त्यानंतर ताबा सुटल्यान ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांमध्ये घुसला.
मिरज तालुक्यातील बेडग येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकान गाळयात भरधाव ट्रक घुसल्याने भीषण अपघात घडला आहे. बेडग-मंगसुळी रस्त्यावर कर्नाटक कडून येणारा एक ट्रक अचानक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विजेच्या खांबाला जोरात धडकला आणि त्यानंतर ताबा सुटल्यान ट्रक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांमध्ये घुसला. या घटनेत ८ ते १० पत्र्याचे आणि लाकडी दुकान गाळे ट्रक खाली चिरडून भुईसपाट झाले आहेत. घटनेनंतर मद्यधुंद चालक आणि क्लिनर यांनी पळ काढला. या अपघातात दुकान आणि साहित्यांचे सुमारे १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी पहाटेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.