महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांनी भारतीय 'ब्रँड' निर्माण करण्याचे ध्येय बाळगावे - ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर - ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर प्रतिक्रिया सांगली

सांगलीमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात प्रामुख्याने ग्रह ताऱ्यांच्या गंमती जमती, आकाशगंगा, ग्रहण याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी तारांगण ही साकारण्यात आले आहे.

sangli
विद्यार्थ्यांनी भारतीय 'ब्रँड' निर्माण करण्याचे ध्येय बाळगावे - ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर

By

Published : Dec 10, 2019, 11:39 PM IST

सांगली -आर्थिक सुबत्ता ही देशाच्या तंत्रज्ञानावर ठरते त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानात भारतीय 'ब्रँड' निर्माण करण्याचे ध्येय बाळगले पाहिजे, तरच अमेरिकेपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वाढेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केले. सांगलीमध्ये आयोजित विज्ञान, तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

विध्यार्थ्यांनी भारतीय 'ब्रँड' निर्माण करण्याचे ध्येय बाळगावे - ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर

हेही वाचा -तासगाव नजीक तिहेरी अपघात, एसटीतील 19 प्रवाशी जखमी

सांगलीमध्ये जिल्हास्तरीय विज्ञान, तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात प्रामुख्याने ग्रह ताऱ्यांच्या गंमती जमती, आकाशगंगा, ग्रहण याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी तारांगण ही साकारण्यात आले आहे. 31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना हसत खेळत विज्ञानाची गोडी निर्माण होण्याच्या उद्देशाने अनेक प्रयोग, त्यांची माहिती, लघुपटाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. शहरातील टिंबर भागातील भिडे मंगल कार्यालय येथे प्रसादिती सायन्स सेंटर यांच्याकडून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा -मनात जिद्द असेल तर वयाची अडचण येत नाही! ८२ वर्षांच्या आजोबांची 'सांगली ते नांदेड' सायकलवारी

या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी आज भारतात अनेक टीव्ही कंपन्यांचे ब्रँड आहेत. पण भारतीय ब्रँड नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भारतीय 'ब्रँड' निर्माण करण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. तसेच आज कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती ही त्यादेशातील तंत्रज्ञानावर ठरते. त्यामुळे अशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे. तसेच भारताची लोकसंख्या ही अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा आणि तेथील तरुणांपेक्षा भारतातील तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समाजाला, राष्ट्राला काय लागते? याचा विचार करून त्या गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत. तशी ईर्षा आणि ध्येय बाळगले पाहिजे, असे मत काकोडकर यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details