महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी अभिजित चौधरी - जिल्हाधिकारी अभिजित चौधरी

लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून ज्येष्ठ नागरिकांसह वयोवृद्धांनी लसीकरण करून करून घ्यावे,असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले आहे.

Collector Abhijit Chaudhary
जिल्हाधिकारी अभिजित चौधरी

By

Published : Mar 2, 2021, 4:56 PM IST

सांगली -लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून ज्येष्ठ नागरिकांसह वयोवृद्धांनी लसीकरण करून करून घ्यावे, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. 22 जानेवारी पासून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 6 हजार 85 जणांवर दंडात्मक कारवाई आली. व एकूण 16 लाख 16 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

जिल्हाधिकारी अभिजित चौधरी
आतापर्यंत 28,863 जणांचे लसीकरण-
तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात तिसरा टप्पा सुरू झालेला आहे. जिल्ह्यात पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील लसीकरण आतापर्यंत यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील 28 हजार 863 जणांचे लसीकरण झाले असून आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात झाली. यामध्ये 70 जणांचा लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर पुढील लसीकरणासाठी प्रशासन आहे.


ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे-

जिल्ह्यात महापालिका क्षेत्रासह तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 25 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यामध्ये सांगली शासकीय रुग्णालयासह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर खासगी रुग्णालयातही पुढील टप्प्यात लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे. त्यासाठी संबंधित पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असून त्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा-कामठा फाटा येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला

ABOUT THE AUTHOR

...view details