सांगली - कडेगाव येथील ज्येष्ठ अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांचे ह्रदय विकाराने बुधवारी निधन झाले आहे. ते 73 वर्षाचे होते. देशमुखे हे कडेगाव - खानापूर तालुका साहित्य परिषदेचे संस्थापक होते. अंध कवींच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
साहित्यिकांसाठी असायचे नेहमी पाठबळ -
कडेगाव येथील संवेदनशील व्यक्तिमत्त्व व धान्याचे प्रसिद्ध व्यापारी आणि कवी चंद्रकांत देशमुखे उर्फ बाबूजी यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले. बालपणापासून अंध व शिक्षणाचा कसलाही गंध नसलेले देशमुख यांनी आपल्या कवितेतून देशभक्ती रुजविण्याचे त्यांचे काम गेली ५७ वर्षे अविरतपणे सुरू होते. देशमुखे हे कडेगाव - खानापूर तालुका साहित्य परिषदेचे संस्थापक - सदस्य तसेच विद्यमान खजिनदार म्हणून कार्यरत होते. परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ वाढीसाठी विविध साहित्यिक कार्यक्रम राबवून मोठे बळ देशमुखे यांनी दिले होते. जिल्ह्यातील साहित्यिकांनाही त्यांचे पाठबळ राहिले होते.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात सादर केल्या कविता -