सांगली: मारुती श्रीकांत माने,वय 37 राहणार, मुळ शिंदेवाडी,सद्या महादेव कॉलनी मालगाव रोड, मिरज हा ट्रक चालक आहे. त्याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.तीन महिन्यांपूर्वी त्याने पहिल्या पत्नीला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे काम असल्याचे सांगून निघून गेला. दरम्यान तो शहरातील महादेव कॉलनी येथे रोज फिरत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले, याची माहिती मारुतीच्या पहिल्या पत्नीला मिळाली. त्यानंतर पहिल्या पत्नीने महादेव कॉलनी येथे जाऊन चौकशी केली असता, त्याने दुसरे लग्न केल्याचा प्रकार समोर आला.
Second marriage complaint : पोलीस असल्याचे भासवून दुसरे लग्न पहिलीने तक्रार करताच गायब - pretending to be police
एका ट्रक चालकाने पोलीस उपनिरीक्षक आणि करोडपती असल्याची भासवून ( pretending to be police ) एका तरुणीला प्रेमाच्या जाळयात अडकवून दुसरे लग्न (Second marriage) केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारुती माने, असे या ट्रक चालकाचे नाव आहे, लग्नानंतर तो पसारा (Disappear as soon as the first wife complains) झाला आहे.या प्रकरणी दुसऱ्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
काही महिन्यांपूर्वी त्याने एका तरूणीला मी पोलीस उपनिरीक्षक असून आपली 50 एकर जमीन आणि कोट्यवधीची मालमत्ता असल्याचे सांगत त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, त्यानंतर त्या तरुणीस वेगवेगळ्या वाहनातून फिरवुन लग्नासाठी तयार करत तिला फसवून दुसरे लग्न केले. पहिले लग्न झाल्याचे तीला कळू दिले नाही. मात्र काही दिवसांपूर्वी दुसर्या पत्नीला देखील कामी निमित्ताने बाहेर जात असल्याचे सांगून पोबारा केला आहे.हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर फसवणूक झालेल्या दोन्ही पत्नींनी मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेत,मारुती माने याच्या विरोधात गुन्हा दाखल केले आहे.