सांगली- जेसीबी खाली चिरडून एक शाळकरी मुलगा ठार ( schoolboy killed in Sangli ) झाला आहे. रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या अवस्थेमध्ये जेसीबी डोक्यावरून गेल्याने ही घटना घडली आहे. इस्लामपूर पोलिसांनी तातडीने तपास करत जेसीबीच्या चालकाला ( Islampur Police arrest driver ) अटक केली आहे. हर्षवर्धन नागनाथ पाथरवट ( वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे.
अर्धी कवटी गायब असलेला मृतदेह सापडला !
सांगलीच्या इस्लामपूर या ठिकाणी असणाऱ्या वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर ( Accident on Waghwadi to Islampur road ) अभियंता नगरमध्ये कृषी महाविद्यालयाच्या कुंपणाचे काम सुरू आहे. तेथे भिंतीलगत पाथरवट समाजाचे नागरिक गेली अनेक वर्षे दगड घडवण्याचे काम करत असतात. या दगड काम करणाऱ्यामधील तिघेजण रात्री रस्त्यावर झोपले होते. झोपलेल्या स्थितीमध्ये आज सकाळी एका मुलाचा मृतदेह मिळल्याने एकच खळबळ माजली आहे. हर्षवर्धन नागनाथ पाथरवट ( वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. धक्कादायक बाब अर्धी कवटी घटनास्थळाहून गायब असल्याची बाब निदर्शनास आली. विशेष बाब म्हणजे हर्षवर्धनच्या आजूबाजूला झोपणारी दोघेजण सुरक्षित होते. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यामुळे या घटनेमुळे उलट-सुलट चर्चा सुरू होती.
हेही वाचा-Shocking News : 11 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म