सांगली -शहराला महापुराचा विळखा पडलेला आहे. यामुळे सांगलीत जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम झाला आहे. पाणी, दूध, भाजीपाला आणि सिलेंडर यांचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्याने सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
महापुरामुळे सांगलीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ - latest news about sangali
सांगली शहरातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी, वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहरात काही ठिकाणी वॉटर एटीएम आहेत. पण तिथे पाणी विकत घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
![महापुरामुळे सांगलीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4074804-thumbnail-3x2-sangali.jpg)
सांगली आणि कुपवाड शहरातील पाणीपुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे सांगली शहरातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी, वणवण भटकण्याची वेळ आली आहे. शहरात काही ठिकाणी वॉटर एटीएम आहेत. पण तिथे पाणी विकत घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यामुळे पिण्याचे पाणी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरातला दूध पुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात दूध, भाजीपाला आणि सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. दूध 70 रुपये लिटर तर भाजीपाला महाग दराने विकला जात आहे. तर बँकांची ATM सेवाही बंद पडली आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र सद्या सांगलीत पाहण्यास मिळत आहे.